घ्या गड्या ! समशेर ती

(चाल : क्यों नही देते हो दर्शन..)
घ्या गड्या ! समशेर ती, वैराग्य नामे जी कुणी ।
ना भरवसा   डाकुचा, नेतील   कारया  लुटवुनो ॥धृ।।
पाच - साहा भोवती, नच सोडिती नगरीप्रती ।
बळि विवेका पाडती, द्या साह्य त्याला रे ! कुणी ।।१।।
जोडप्याच्याची गुणे, विषयांध बनती शाहणे ।
मारा अता इच्छा - मने, काढा तया स्वघरातुनी ।।२॥
वासना बहु दिनची, सत्ता तया सकला हिची ।
प्रथम ही काढा रुची, मग चोर  घेती  लोळणी ।।३॥
बाप सर्वांचा असा, प्रारब्ध नावे   त्या  ठसा ।
दास तुकड्या तो पिसा, तारावया घ्या श्रीगुणी ।।४।।