तव नाम मधुर किति सांग हरी !
(चाल: प्रभू ! मंगलमय तव नाम सदा..)
तव नाम मधुर किति सांग हरी ! ।।धृ0।।
हरि हरि स्मरता किति तरि तरले, जपता संकट पार करी ।।१।।
नीलकंठ शिव दुःखित जहरे, प्रभु-नामचि त्या शांत करी ।।२॥
नामस्मरणे शीला तरती, शास्त्र - पुराणहि ग्वाहि भरी ।।३॥
तुकड्यादास म्हणे तल्लिन मी, श्रीहरिनाम धरोनि उरी ॥४॥