किति प्रेमळ रुप तुझे गमते ?
(चाल: प्रभु! मंगलमय तव नाम सदा..)
किति प्रेमळ रुप तुझे गमते ? ।|धृo।।
वाटे सोडुनि ना जावे कधि, जीव-बुध्दि पायी नमते ।।१।।
मोर- मुकुट पीतांबर सुंदर, मधुर बासरी वाजविते ।।२।।
गोप गोपिंचा जीव प्राण जो, योगि-मनाला रंजविते ।।३॥
तुकड्यादास म्हणे त्या ठायी, मुक्ति पावती भक्त जिथे ॥४।।