अति घोर भवाची ज्वाला, ज्वाला गा

(चालः अशि घाल गळा मिठि बाळा...)
अति घोर भवाची ज्वाला, ज्वाला गा ! ||धृ०।।
चैन पडेना क्षणभर देहा, ग्रासु बघे ? विषयाला गा !॥१॥
सत्संगतिला वेळ न फावे, कठिण गमे चित्ताला गा !।|२|।
मद - मत्सर हे धूर तियेचे, उंच नेत मनुजाला गा ! ।।३॥
तुकड्यादास म्हणे मज निववी, एक गुरुचा प्याला गा ! ॥४।।