राधारमण दर्शनाला

(चालः राधे! इतुका कशाला...)
राधारमण दर्शनाला, कोणी न्याल का अम्हाला ?।।धृo।।
यमुनेकाठी चरती गायी, खेळति गोपी-गोप सदाही ।
नाचे प्रीय बंसिवाला ।। कोणी 0।।१।। 
मयुरपिसारा सुंदर साजे, श्यामकांति घनश्याम विराजें।
शोभे   वैजयंतिमाला ।। कोणी 0॥२।। 
कुंजवनीचे कुंज-बिहारी, करिती क्रीडा नट गिरिधारी ।
पावा मोहवी मनाला ।। कोणी0 ।।३।।
तुकड्यादास म्हणे संतासी, ठावे स्थान असे तुम्हासी ।
दावा कृष्ण-रासलीला।। कोणी0 ॥४॥