विना ज्ञान - वैभवी, आत्ममुख नाही ज्या ठायी

(चाल कसा निभवशी काळ)
विना ज्ञान - वैभवी, आत्ममुख नाही ज्या ठायी ।
ऐशा गुरुने खुशाल झोळी - भिक्षा  मागावी ॥धृ०।।
आपण बुड़नी भव-सागरि या दुसय्रा बुडवावे ।
ऐसे कवणे सांगितले ? मज नाही गुज  ठावे ।।१।।
शिष्यपणाचा अधिकार ही, नाही ज्या आला ।
गुरु-उपदेशा पात्र कसा तो, जगती या झाला ? ।।२॥
खुशाल रांडा- पोरे पोसुनि, घर - धंदा साधा ।
नातरि भिक्षा मागत घर - घर   म्हणा नंद  कंदा ।।३॥
का इतुक्या या बाह्य भूषणे, काळ तुम्हा भ्याला ?
तुकड्यादास म्हणे समजा गुज, साधा अपुल्याला ।।४।।