सकळ कळे, हे का न कळे ?
(चालः जमुनातट राम खेले...)
सकळ कळे, हे का न कळे ? सकळ कळे ।।धृ०।।
गृह -धन-दारा वैभव सारे, सुंदर महाली चित्त वळे ॥१॥
पैसा - पैसा बांधसि गाठी, परद्रव्यावर चित्त चळे ॥२॥
मान-सुमानी गर्व धरोनी, मी मोठा म्हणविसी बळे ॥३ ॥शाल-दुशाला,गादी-तकिया,पाहूनिया मन उचंबळे ॥४॥
कर्म-उपासन, साधन-आसन, करावया मन दूर पळे ।।५।।
हे कळते पण व्यर्थचि सारे, अंती यम तो नेइ बळे ।।६॥
जोवरि सद्गुरु चरणि न धाला, तोवरि यमदंडचि मिळे ।।७॥
तुकड्यादास आस सद्गुरुची मी,तू भाव तरीच पळे ।।८॥