काय उगिच हा मोह मदाचा
(चाल: गावो रिध सिध मंगल..)
काय उगिच हा मोह मदाचा, होइल सर्वहि नाश जगाचा ।।धृ0।।
सुख असे कमवा रमवा मनि, नाश न होय कधीच जयाचा ।।१।।
धन-दारा ही दो दिवसाची, कोणि न धरती संग कुणाचा ॥२॥
दिसते परि हे नसते काही, शोध करा साधू-वचनाचा ॥३॥
तुकड्यादास म्हणे वळवा मन, घ्यावा स्वाद-मुकुंद-पदाचा ।।४॥