हा खेळ प्रभूच्या घरचा

(चालः ऊठ दे झुगारुनि बेडी...)
हा खेळ प्रभूच्या घरचा, मिटवाया हात कुणाचा । ये पुढे ? ॥धृ०।।
ही निसर्ग बागहि त्याची, तोडाया छाति कुणाची । ये पुढे ? ।
मोलाविण अग्नी - पाणी, देतो या लोकी कोणी । ये पुढे ? ॥
(अंतरा) हा नसे, नसे परि दिसे, भास व्यर्थसे,
खेळ मायेचा जाणता कोणहो याचा ? ये पुढे ।।१।।
स्तंभाविण रचना केली, गवसली बुद्धिची खोली । कोणत्या ? ॥
पाण्यावर रचले भू-ला, साधते काय पनुजाला । कोणत्या ? ॥
रवि-चंद्र-तारका अथर, जडविता आलि का कोर । कोणत्या ? ॥
(अंतरा) सागरा, ऊत ये पुरा, ऊर्मिसी झरा ।
वाहतो कैचा ? पाहणारा साक्षी याचा । ये पुढे ।।२।। 
कोण या मुळाशी आहे ? हे बघता खाती हाय । जाणते ।।
हा जड-चैतन्य विवाद, जाणती योगि संवाद । जाणते
एकाच शक्तिची वेली, गुंफली ही जाणे बोली । जाणते ।।
(अंतरा) तो हरी निराळा दुरी, दिसेना वरी ।
परी सर्वांचा, भेट हा जाणता त्याचा । ये पुढे ।।३।।
एकाच जिवाने केली, परि भित्न-भित्नता झाली । लोकि या ।।
कुणि सूर-असूर बनावे, कुणि खावे, कोणी द्यावे । लोकि या ।
कुणि सुखी दुःखि, कुणि भोगी, कुणि राहति जन्मी रोगी । लोकि या ।।
(अंतरा ) ह्या खुणा, जाणि तो म्हणा,खरा शाहणा ।
पुत्र सद्गुरुचा, तुकड्यास प्रेम हा त्याचा । ये पुढे ।।४।।