किति गोड तुझी गुणगाथा

(चाल: ऊठ दे झुगारुनि बेडी...)
किति गोड तुझी गुणगाथा, वाटते मधुर भगवंता ! । अंतरी ।।धृ०।।
भजति तुला जिवभावे,ते पुन्हा जन्मि ना यावे । करिशि तू ।।
काय हे मीच सांगावे ? श्रुति-शास्त्र-पुराणा ठावे । सर्व हे ॥
प्रत्यक्ष पाहता यावे, मग प्रमाण कैचे द्यावे । त्याजला ? ।।
(अंतरा) जे धीर, करिति मन स्थीर, देउनी शीर ।
रंगती  गाता,   रंगती   गाता  । 
ठेविशी वरद त्या माथा । श्रीहरी ! ।।१।।
जे तुझे समजुनी झाले, ते कळिकाळा ना भ्याले । सर्वथा ।
सुखदुःख तयावरि आले, हसुनिया सहन ते केले । सर्वही ॥
गिरिपरी विघ्न कोसळले, तिळमात्र न मनि हळहळले ।भक्त ते ।।
(अंतरा) द्रौपदी,न भ्याली कधी, सभेच्या मधी ।
वस्त्र ओढिता, वस्त्र  ओढीता ।
धावला  घेउनी   हाता ।
प्रल्हाद भक्त देवाचा, ऐकिला चौघडा त्याच्या । कीर्तिचा ॥
केला बह छळ देहाचा, परि सोडि न जप नामाचा । तिळभरी ।
विष-अग्नि-व्याघ-सर्ांचा, करविला कडे लोटाचा । यत्नही ॥
(अंतरा) किति प्रेम ? न सोडी नाम, जाउ द्या प्राण ।
धन्य ती ममता, धन्य ती ममता ।
तारिशि त्या   हसता हसता। धावुनी ॥३॥
सम स्थान भक्त वैऱ्यासी, ही उदारता कोणासी । गवसली ? ।।
यशोदेसि ती पुतनेसी, भक्तासी ती कंसासी । दाविशी ।
घेऊनि माग वेळेसी, भक्तांच्या वचना देशी । पुरवुनी ॥
(अंतरा) ती कणी, गोड मानुनी, पीशि धावुनी ।
विदूरा हाता, विदूरा   हाता ।
निर्मळ प्रेमाचा दाता । तू हरी ! ।।४॥
पांडवा साह्य देऊनी, फिरशी तू रानो-रानी । त्यासवे ।।
विति दासाची तुज प्रीती, खाजविशी घोडे हाती । आपुल्या ।। 
बहु दीन सुदामा भक्त, बसवी कांचन-महालात । आवडी ।।
(अंतरा) अम्हि दीन,तुझ्या पदि लीन, गाउ तव गुण ।
लक्ष्मीकांता   लक्ष्मीकांता ! ।
तुकड्यासी घे पदि आता । उचलुनी ! ।।५।।