सुख येइ घरा, अति कष्ट करा
(चालः गुरु तुमहि तो हो गुरु..)
सुख येइ घरा, अति कष्ट करा, कष्टाविण शांति न होइ नरा ।।धृo।।
कष्टचि करता संत निमाले, तरले या भवदुःखपुरा ।।१।।
कष्टे राज्यहि पावे सुगमे, आळस हा अति दूर करा ।।२।।
कष्टे धर्म, कर्म, व्रत होते, कष्टचि नेई आत्म - पुरा II३।।
तुकड्यादास म्हणे, ज्या कष्टी, नारायण हो तेचि वरा ।।४।।