कुणि शत्रु कुणाचा नाहि गड्या !

(चालः गुरु तुमहि तो गुरु...)
कुणि शत्रु कुणाचा नाहि गड्या ! कुणि मित्र कुणाचा नाही गड्या !।।धृ०।|
सर्र असे हे अपुल्या हाती, अपुली कर्मे ग्वाहि गड्या ! ॥१॥
आपण दुसय्रा दुसरे आपणा, वागु तसे जग राहि गड्या ! ।।२।।
आपण लोभी जगही फसवे, ठगा- ठगाची डाइ गड्या ! I।३॥
तुकड्यादास म्हणे निर्मळ हो, जग हे ईश्वर पाहि गड्या ! I।४॥