अति व्याकुळ हे मन, शांति नसे

अति व्याकुळ हे मन, शांति नसे, करू काय कसे ? न सुचे हरि रे ! ।।धृ०।।
जप तप नाना करुनी श्रमलो, चंचल मन हे नावरि रे ! ।।१।।
तिर्थी धोंडापाणी पुजिले, पक्ष्यासम फेरे करि रे ! ।।२।।
दान - पुण्य योगहि ते केले, वाढे अभिमानचि उरि रे ! ।। ३।।
तुकडयादास म्हणे ज्ञानाविण, सुख नसे दुसरे तरि रे ! ।|४।।