किति सुंदर चंद्र मनोहर हा
(चाल : गुरु तुमहि तो हो गुरु...)
किति सुंदर चंद्र मनोहर हा, गमतो जणु राजा ताऱ्यांचा ॥धृ०।।
सुख देत किती नभ-मंडळ हे, जिव मोहनि नेत विकाऱ्यांचा ॥१॥
या सृष्टिवरी तरि तेच गती, प्रभु शोभत आश्रय जीवांचा ॥२॥
जे भक्त तया भजती नमती, जिव प्राणचि तो या सर्वांचा ।।३॥
तुकड्यादास म्हणे जग सारे, घेत प्रकाश तया हरिचा ॥४॥