सृष्टीच्या सृष्टीकर्त्या ! कोणी पाहिले तुला ?

(चाल: वनवासी राम माझा...)
सृष्टीच्या सृष्टिकर्त्या ! कोणी पाहिले तुला? ।।धृ0।।
काननात बसती  साधू, नातुडसी   त्याला ।।१।।
ध्यान लावुनिया योगी, बघती ध्यानि तुला ।।२।।
रंक-राव स्मरती तुजला, भेटसी न त्याला ।।३।।
साक्ष अशी असती नेत्या, नेत्रि  बघायला ।।४।।
शांतविण्या तुकड्यादासा,येशि का कृपाला!।।५।।