कैसी जाईन मी रे घरी ?

         (चाल: रुसलासी हरी का बरे..) 
कैसि जाईन मी रे घरी ? आवरी आपुली बांसरी।।धृ0।।
तान्हे बालक आहे घरा, पति बोले अति बावरा ।
प्रेम सोडेचिना हे हरी ! आवरी आपुली बासरी ।।१।।
सुध देहाची नाही जरा, जीव झाला पिसा-घाबर ।
काय म्हणतील मज सासरी? आवरी आपुली बासरी ।।२।।
कामधंदा घरी राहिला, वेळ मार्गीच झाला मला ।
दास तुकड्या म्हणे, श्रीहरी ! आवरी आपुली बासरी ।।३।।