किति तरि गोड तुझे हरि ! नाम
(चाल : तुम्हारे पूजन को भगवान..)
किति तरि गोड तुझे हरि ! नाम, स्मरता शांत होतसे काम ।।धृ0।।
गोपी नाम स्मराया गेल्या, देहादेहि नुरेशा झाल्या ।
झाला जीव-भाव बेफाम, स्मरता शांत होतसे काम ।।१।।
दुःशासन द्रोपदिला ओढी,करण्या नग्न वस्त्र ते सोडी।
नामे लाज राखि घनश्याम, स्मरता शांत होतसे काम ।।२।।
भोळा शंकर डमरुवाला, हलाहल मंथनी प्याला ।
नामे पावतसे आराम, स्मरता शांत होतसे काम ।।३।।
धृव -प्रल्हाद संकटी पडले,वज्रापरि दुःखहि कोसळले। ॒नामे दिले तया जिवदान, स्मरता शांत होतसे काम ।।४।।
तुकड्यादास म्हणे त्या नामे,तरती पाषाणहि परिणामे।
अंती भक्ता दे निजधाम, स्मरता शांत होतसे काम ।।५।।