स्वस्थ का बा, भारता ! पाहसी कुणाची वाट तू ?

           (चाल;ठेविले पाउल दारी...) 
स्वस्थ का बा, भारता ! पाहसी कुणाची वाट तू ? ।।धृ०।।
कोण देतो आणुनी, तुज भाग्य कष्टावाचुनी ?
सोड ही आशा अता, चल वाट पुढची गाठ तू  ।।१।।
सावरी कर्तव्य-घोडा, आवरी व्यसने अता ।
सोड ही  बलहीनता, चढ   उद्दमाचा   घाट तू  ।।२।।
राहू दे मागे अता ही, भावभक्ती आंधळी ।
राष्ट्रसेवा  साधण्या, धर  सत्यतेचा  काठ  तू  ।।३।।
त्याग कफनी घालुनी, जय-भस्म लावी देहि या ।
दास तुकड्या सांगतो, जनता-जनार्दन गाठ तू ।।४।।