अचाट अवघड घाट, कसा थाटाने तरशी रे ?

         (चाल: कस्ता निभवशी काळ..)
अचाट अवघड घाट, कसा थाटाने तरशी रे ?
चुकली वेळा संधीची तर, भटकत फिरशी रे ! ।।ध0।।
भवसागर हा दुस्तर बापा ! कैसा   हरशी  रे ?
नको दाखवू गर्व कुणाला, मधीच  मरशी  रे ! ।।१।।
विसरु नको श्रीगुरुच्या नामा, तो अविनाशी रे !
त्याविण नाही दैवत बापा ! नच जा  काशी  रे ? ।।२।।
प्रगट करी अंतरिच्या भावा, भज अविनाशी रे !
तुकड्यादास म्हणे त्या भजण्या, धर पद श्वासी रे ! ।।३।।