राहू दे, मन हे, तुझ्या पदी राहू दे
(चाल: मोहनी मूरत तुम्हारी...)
राहू दे, मन हे, तुझ्या पदि राहु दे ।
भेद सगळे जाउ दे, तव रुप निर्मळ पाहु दे ।।धू0।।
आस नाही दूसरी, हा जन्म सगळा वाहता ।
होउ दे सेवा प्रभु ! या नश्वरा देहे अता ।।१।।
कोण नेइल संपदा ही, अंतकाळी बांधुनी ?॒
राहतिल हे जागि सारे, विषयसुख दिसते जनी ।।२।।
दास तुकड्या वांच्छितो, विसरु नको गरिबा हरी ।
दीन अम्हि तव पायिची, या बालकासी सावरी ।।३।।