खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या
(चाल: रुसलासी हरी का बरे...)
खेळ खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहनी ।।धृ0।।
भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऐकता ।
रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहनी ।।१।।
जात होती यमूनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी ।
माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहनी ।।२।।
दास तुकड्या म्हणे ही लिला, देव गोकुळासी खेळला ।
उद्धरील्या सख्या गोळणी,राधिकेच्या मना मोहुनी ।।३।।