गडे हो ! वेळ अशी गवाल, शेवटी

(चाल : तुम्हारे पूजनको भगवान...)
गडे हो ! वेळ अशी गमवाल,शेवटी चौर्यांशी भोगाल ।। धृ0।।
दुनिया दिसते रंग-रंगीली,जीव-जिवांनी छान छबीली ।
व्यर्थचि पाहुनिया  भाळाल । शेवटी0।।१।।
ज्वानी अंगी काढी जोर, पळती जसे काननी ढोर ।
त्यापरि कोंडवाडिया जाल । शेवटी0।।२।।
जैसे करणे तेसे भरणे? न चुके कोणाच्या देवाने? ।
वाजविल अंती यम तो गाल । शेवटी0।।३।।
तुकड्यादास म्हणे त्या कामा, सोडुनि भजा हरी घनश्यामा !
नाही तरी   कुणाचे  न्याल ? । शेवटी0।।४।।