संत - समागम साधा, गडे हो !

(चाल: भूषविशी जननीला...)
संत-समागम साधा, संत-समागम साधा । गडे हो ! ।।धृ०।।
सकल सुखाचा आगर तोची, तोडा ही भव-बाधा ।।१।।
क्षणिक सुखाशी रत होउनिया, का धरता उन्मादा? ।।२।।
सतसंगाविण ज्ञान न  पावे, तोडा  हा  जग - फंदा ।।३।।
तुकड्यादास म्हणे अनुभव घ्या,चाखा निर्मल स्वादा ।।४।।