हरी गात चला, हरी गात चला
(चाल: गुरु तुमहि छी हो गुरू...)
हरि गात चला,हरि गात चला,हा मार्ग भला सकळास खुला ।।धृ0।।
सुख दु:ख सहा,मनि शांत रहा,निजज्ञानरुपी मनसोक्त डुला ।।१।।
संसार पिसे आत्म्यास नसे, हा भास मुळापासून भुला ।।२।।
आनंदि रहा प्रभु-छंदि रहा, भव- वैभव हे मनि तुच्छ तुला ।।३।।
तुकड्यास रुचे पदची हरिचे,मनि ध्यात चला मग मोक्ष खुला ।।४।।