सुख - दुःख भोग सारे , चुकती न हे कुणाला
(चाल : रसनें ! न राघबाच्या...)
सुख-दु:ख भोग सारे, चुकती न हे कुणाला ।
हो संत देव, साधू, राजा किंवा प्रजेला ।।धृ0।।
केले तसे भरावे, मनि शांत होत जावे ।
प्रभु-नाम गात जावे, समजावुनी मनाला ।।१।।
एक बेळ तूप-मांडा, एक वेळ भूस-कोंडा ।
देऊनि राहि पिंडा, जो भोग देवि आला ।।२।।
कधि शाल-जोडि अंगी, कधि भूषणेहि जंगी ।
कधि अंग डोकि नंगी,सांगो तरी कुणाला?।।३।।
तुकड्या म्हणे करावे, तैसेचि हे भरावे ।
प्रभुला समर्पुनीया, सेवू सुखे तयाला ।।४।।