जाइल हा नरदेह गडया ! मग काय पुढे
(चाल: आशक मस्त फकीर हुआ...)
जाइल हा नरदेह गड्या ! मग काय पुढे करशील मजा ? ।।ध0।।
चार दिवस हे हौसेचे, समजोनि राहशी अंतरि तू ।
अति दुःख पुढे यम देइ जिवा, मग कोण तुला देईल रजा? ।।१।।
करशील जसे भरशील तसे, चुकते न कसे कोणीहि असे ।
तुकड्या म्हणे काय अम्हा करणे? हुशियार रहा भरशील सजा ।।२।।