किति वाटे मधुर हा ध्वनी! वेणु वाजे कुणाची वनी?
किति वाटे मधुर हा ध्वनी! वेणु वाजे कुणाची वनी? |।|धृ० ||
जैसि गाते वनी कोकिळा, पुष्पि डोले जसा भोंगुळा |
जाउ पाह सखे साजणी! वेणु वाजे कुणाची वनी? ।॥।१॥।
गोपि मोहीत झाल्या किती? सोडुनीया घरा धावती |
लाविले वेड यांना कुणी? वेणु वाजे कुणाची वनी?1॥।२॥।
गायि पळती यमुने-तिरी ! मार्गि हंबरती निर्भरी।
कर्ण टवकारिती ऐकुनी, वेणु वाजे कुणाची वनी?।|३॥|
गोप हर्षे पथी नाचती, देव स्वर्गाहुनी पाहती |
योगी तन्मय झाले मनी, वेणु वाजे कुणाची वनी? ।|४॥|
पशु-पक्षी भरारी करी, ऐकताती प्रभू-बंसरी ।
तुकड्यादासा पडे मोहनी, वेणु वाजे कुणाची वनी? ।।५॥|