तू काया कुणाचे नेशिल रे ?
( चाल : गुरूदेव हमारे आवो...)
तू काया कुणाचे नेशिल रे ? मग प्राणचि घेउन जाशिल रे ।।धृ0।।
करिशि कशाला हाव भवाची? जे दिसते ते नाशिल रे ! ।।१।।
माझे माझे म्हणतचि वाया, यम-घरी गोते खाशिल रे ! ।।२।।
मित्र-गडी-गण धन-सुत-दारा,शेवटि तुजला हाशिल रे ! ।।३।।
तुकड्यादास म्हणे तरशिल तू, सद्गुरुचे गुण गाशिल रे ! ।।४।।