स्मरणात भावना विरली, मनाचि सुधबुधी हरली

(चाल: ही ऐक आस मनि उरली...)
स्मरणात भावना विरली, मनाची सुधीबुधी हरली ।।धृ0।।
कुणि काही म्हणो जन मान,वा असो कुठे वनरान ।
रंगात   मती  ही  स्फुरली । मनाची0 ।।१।।
जरि सुटला तुटला प्राण, ना तरी तनू-अवसान ।
एकतार तारि  उरि  भरलि । मनाची0।।२।।
सद्‌-वृत्ति हरी ! दे दान,नच मागु तुला रे ! आन ।
तुकड्याचि कामना मुरली । मनाची0।।३।।