राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुनांनो !

          (चाल:तुजबिन मोरी कोन...) 
राष्ट्र जगावा, राष्ट्र जागवा; जागृत व्हा तरुणांनो ! अमुच्या ।
वीर वृत्तिचा दिवा उजळवा,जागृत व्हा तरुणांनो ! अमुच्या 0 ।।धृ0।।
धर्मनीति ही दलित दलापरि, भारतभूची झाली ।
भक्तिमुक्तिचे सोंग वाढले, दुर्बलता करि आली ।अमुच्या0 ।।१।।
तत्वज्ञान हे विसरुनि गेले, रुढिस मान मिळाला ।
जिकडे तिकडे पंथ-मतांतर, गोंधळ हा घरि आला ।अमुच्या0।।२।।
सुळसुळाट हा साधुजनांचा, पोट भराया झाला ।
यथार्थ कोणी सांगि न कोणा,भ्याडपणा उरि आला । अमच्या 0।।३।।
सत्य भक्तिचे विसरुनि पथ हे, पोकळ भाव निघाला ।
देवावरती वाहि फुले परि, पाणि न दे गरिबाला । अमुच्या 0।।४।।
तुकड्यादास म्हणे ही कहाणी, सांगा हो ! जनतेला ।
नाहि तरी मरणेच बरे हे, भुत परका घरि आला । अमुच्या 0।।५।।