रे गणराया ! नमितो मी आधी तुला

     (चाल: सुदामजी को देखते श्याम..)
रे गणराया ! नमितो मी आधी तुला ।।धृ0।।
सर्व  अंगि  शेंदूर   चर्चुनी, बेंबी   हिरा   माखला ।।१।।
स्फटिक कुंडले शोभति कानी, गळा मुक्त-माला ।।२।।
मुकुट मस्तकी, सोंड विराजे, करी मोदक-माला ।।३।।
तुकड्यादास शरण ज्या गेला, चरणी ठाव दिला ।।४।।