उठारे गडया ! काळ बिकट पातला
(चाल : सुदामजी को देखत श्याम हसे...)
उठारे गड्या ! काळ बिकट पातला ।।धृ0।।
आळस का करिता कार्याचा ! ।
नाही भरवसा या काळाचा ।
ज्वाळ घरा लागला ।। उठारे गड्या 0 ।।१।।
कितितरी मेले आणिक मरती ।
कोण करिल हो यांची गणती ?।
अतिशय सरसावला । उठारे गड्या 0।।२।।
त्यास दया माया मुळी नाही ।
रंक असो वा राव कुणी ही ।
सरळ गिळू लागला ।। उठारे गड्या0 ।।३।।
तुकड्यादास म्हणे ज्या कळला ।
कळताची जो पुढती वळला ।
तोच सुखी जाहला ।। उठारे गड्या0 ।।४।।