घाबरला का तरुण गडयारे ! तुझा पुढारी आला

(चाल: रागे कशाला भरलीस राधे..)
घाबराला का तरुण गड्यारे ! तुझा पुढारी आला,
पुढारी आला, पुढारी आला ।।धृ0।।
सावध हो, चल ये मैदानी ।
निज कर्तव्याला  जागोनी ।
उभाच   बंसरिवाला, बंसरिवाला, बंसरिवाला ।।१।।
गरुडावरती  स्वारि  करोनी ।
उतरत जणु तो दिसे विमानी ।
चक्र सुदर्शनवाला,सुदर्शनवाला,सुदर्शनवाला ।।२।।
दुष्ट   जनांना  ठार  कराया । 
साधु सज्जन हृदयी धराया ।
तुकड्या म्हणे धावला, म्हणे धावला, म्हणे धावला ।।३।।