उठा हो ! दिवस निघाला नवा

(चाल : सुदामजी को देखत श्याम...)
उठा हो दिवस निघाला नवा ।।धृ0।।
तूटुनि तारका दे किलकारी ।
निसर्ग हा  वाजवि  रणभेरी ।
पालट करि वैभवा।। उठा   हो !  दिवस0।।१।।
नव चैतन्य पसरले सारे ।
शिरले  मानवतेचे   वारे ।
गाति तरुण गोडवा ।। उठा हो ! दिवस0।।२।।
समुदायाने करुनी प्रार्थना ।
निंदकतेची हरुनि भावना ।
म्हणति भेद मालवा ।। उठा हो ! दिवस0।।३।।
संधर्षाचे ग्रहण पसरले ।
त्यातूनि जे जे विजयी झाले ।
तेच लावतिल दिवा ।। उठा हो ! दिवस 0।।४।।
तुकड्यादास  म्हणे  जागाना ।
आळस अजूनि तरी सोडाना ।
प्रिय भारत साजवा ।। उठा हो ! दिविस0।।५।।