आचाराविण धर्म कशाचा ? अवाडंबर सगळे

(चाल: येरे प्रभुराया ! धावुनी...) 
आचाराविण धर्म कशाचा? अवडंबर सगळे ।।धृ0।।
गरिब लुटोनी धन वेचावे, धर्म करोनी दानी म्हणावे । याने का भगवंत भेटतो? पाप-पुण्य फळते हे,न कळे ।।१।।
शिर झ॒कवोनी नमन करावे ,परि त्याचे तिळ ना ऐकावे 
उद्धारास्तव   देउनि    पूजा,   ओवाळावे   काळे ।।२।।
मन नच विषयापासुनि मेले , आसक्तीचे डोंगर भरले ।
तुकड्यादास म्हणे हे का रे, पसरुनि बसला जाळे? ।।३।।