अरे ! रिकामा कशाला फिरतं ?

(चाल: कमरेला कमरपट्टा...) 
अरे ! रिकामा कशाला फिरतं ?
तुझं गावच नाही का तीर्थ ? ।।धृ०।।
गावी राहती गरीब उपवासी । 
अन्नसत्र लावितोसि काशी ।
हे    दान   नव्हे    का   अर्थ ? ।। तुझं0।।१।।
तुझ्या गावाची शाळा ही मोडली ।
धर्मशाळा तू शहरी का जोडली ?
याने निघतो का जीवनात अर्थ ? तुझ0।।२।।
गावी गरिबांची घरटी ही मोडली ।
तू तीर्थासि मंदिरे  ही जोडली ।
गाव  -  गुंड    करीती    अनर्थ ।। तुझं0।।३।।
आपुल्या गावाची सेवा जो करतो ।
तोचि कीर्तीने, मानाने तरतो ।
दास तुकड्या म्हणे होई सार्थ ।। तुझं0 ।।४।।