चल जाऊ दे, घ्याया दर्शन

(चाल: राधा गौळण करिते...)
चल जाऊ दे, घ्याया दर्शन ।
गुरुदेवासी करण्या वंदन ।।धृ0।।
लगबग स्नान करुनि गंगेचे ।
धुवुनि  काढुया  मैल  मनाचे ।
नव-स्फूर्तिचे लावुनि उटणे, उल्हासाचे लेवुनि भूषण ।।१।।
हृदय - मंदिरी  दीप  धरोनी ।
आसन निर्मळ शुद्ध करोनी ।
स्थापन करूया गुरुदेवाचे, सुंदर पुष्पित ध्यान चिरंतन ।।२।।
मंजूळ वीणा लावुनि  तारी ।
अनहद्‌ वाद्ये वाजती भेरी । 
तुकड्यादास म्हणे या रे या, तोडू या बोधे भवबन्धन ।।३।।