ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा

(चाल: राधा ना बोले..)
ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा ।
देशात समता नांदवा ।।धृ0।।
एकाच्या महालांत फुलताति बागा ।
दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा ।।
अन्नासाठी फिरतो नागवा ।।१।।
क्रांतीची ही लाट गावात आली ।
पत्यास न्यायास प्रेमास व्याली ।।
राखा   हिच्या    या   वैभवा ।।२।।
तो दास तुकड्या विनवुनि सांगे । 
बैसू चला सर्व   एकाचि  रांगे ।।
निजधर्मतत्वा      जागवा    ।।३।।