साक्ष घे तुझाची छंद मला

(चाल: वनवधु प्रिया मी वावरते...) 
साक्ष घे तुझाची छंद  मला । 
मग नसे कुणीही गंध मला ।।धृ0।।
सर्व सुखाचे सागर आगर ,
निज-कर्माचे कर्म उजागर ।
तारक तू जीवनाला अमुच्या,
विश्वासे      आनंद     मला  ।।१।।
कुणीहि म्हणो मी चुकलो पंथा,
तरी सोडीना मन तव संथा !
एक  मागणी  तुला  अनंता,
होवू न   देई    मंद      मला ।।२।।
जोवरी शक्ति इद्रियि न॒गळे,
तोवरी मी साभाळिन सगळे !
तुकड्यादास म्हणे, मग अंती,
पाजी स्वरुप मकरंद  मला ।।३।।