दुःख सांगावे कोणाला ?
(चाल: सुख आले माझ्या दारी...)
दुःख सांगावे कोणाला ? प्रभू तूचि सखा अमुचा उरला ।।धृ।।
मन चंचल हे रे विषया भवती फिरते ।
नच स्थीर कधी त्यासाठिच रे मरमरते ।।
या पायीच वेडा जिव झाला, दु:ख सांगावे कोणाला ।।१।।
मनि वाटे अपुले सार्थक काही करावे ।
या देहाकडुनी अमर असे घडवावे ।।
तो धन्य जगी नर उध्दरला, दु:ख सांगावे कोणाला ।।२।।
नच वेळ करी, दे दर्शन या तुकड्याला ।
ही ऐक तरी करुणा मम करुण-कृपाला ।।
हा भाव नसे मुळी वरवरला,दु:ख सांगावे कोणाला ।।३।।
घुडनखापा, दि. २२-0९-१९५९