शिरडीत बंधु माझा, म्हणे आडकोजी

           (चाल- प्रेम नांद सखे बाई...)
शिरडीत बंधु माझा, म्हणे आडकोजी ।
दुजा  भाऊ  शेगावात   नांदतो, अजी ।।धृ0।।
तिज़ा ताजुह्यून अमुचा ,मित्र जिव-भाव साचा ।
मुंगसाजी बंधू चवथा, आमच्या भुजी ! ।।१।।
साईखेडचा ही दादा, अमुचाची बंधुराजा ।
खटेश्वराची  हि   माझी, संगती   गुजी ।।२।।
मायबाई माता माझी, सर्वांभूती पान्हा पाजी ।
म्हणे दास तुकड्या याची, भक्ति ना दुजी ।।३।।
                                      सोनेगांव दि. १५-0९-१९५९