अरे ! कोण कोण येतो ?

              (चालं: पजाबी नगम्रा.)
अरे ! कोण कोण येतो ? त्या स्वर्ग सुखाला ! !
सोडोनि वासनेला विसरोनि कल्पनेला ।।धृ0।।
हे काम-क्रोध सारे, मार्गात आड येती ।
अणि लोभ-दंभ-सत्ता, करितील जी फजीती ।
नच भीख घालू यासी, हे सांगु सद्गुरुला ।।१।।
वैराग्य-वस्त्र घाला, घ्या माळ निश्चयाची ।
सतज्ञान भस्म लावा, भक्ती   निरंजनाची ।
तुकड्या म्हणे निघाना,मग वेळ ही कशाला ।।२।।
                                       गुरुकुंज, दि. ५-११-१९५९