स्वच्छंदाने भजन म्हणावे

   (चाल: ओळख पहिली गाली हसते...)
स्वच्छंदाने भजन म्हणावे,
गावे  अणि  नाचावे, भावे ! ।।धृ0।।
भान हरपते या   मादाने ।
तल्लिन मन॒ होते जिव-प्राणे ।।
वासनाच मग नुरते  कसली-
हासत-हासत दिवस क्रंमावे ! ।।१।।
संसाराची   भयानता    ही ।
सगळी जाउनि ये ममता ही ।।
रुसले-कुजले जन जे सगळे ।
धावुनि    येती, पुसती    नावे ।।२।।
सवंगडी जे असतिल कोणी ।
ऐकावी ही  आत्म - कहाणी ।।
तुकड्यादास म्हणे, सोपे हे -
साध करुनी, प्रभु-पद घ्यावे ! ।।३।।
                        -गुरुकुंज आश्रम, दि. 0१-११-१९६१