करिता भेद असा का सगळा ?
(चाल: लाजली सीता स्वयंवराला...)
करिता भेद असा का सगळा ? ?
बोलला भारत दाटुनी गळा ।।धृ0।।
सर्वचि माझी भावंडे ही ।
परस्परांच्या कामी सगळी ।।
नीच-ऊच मग का समजोनी -
दुखविता मन सारे सळसळा ? बोलला0।।१।।
जरि भाषा ही भिन्न बोलली ।।
तरि का हृदये जावी खळली ? ?
वस्तू जोवरि एकचि असते ।
तोवर प्रेमासी का चळा ? बोलला 0 ।।२।।
उद्योगास्तव जाति समजल्या ।
मानवतेसाठी नच उठल्या ! ।।
तुकड्यादास म्हणे, राष्ट्रियता -
एकता मार्ग न हो पांगळा ! बोलला 0।।३।।
-चिमुर, दि. 0३-११-१९६१