एक तरी असु दे अंगी कला !
(चाल: कळेना अजुनी काही मला..)
एक तरी असु दे अंगी कला !
नाहितरि काय फुका जन्मला? ।।धृ0।।
पशु-पक्षांची योनि जयाची ।
काय अपेक्षा धरा तयाची??
परि तेही दाखवी चमक ती ।
लोक पाहती त्यात गुणाला !
नाहितरि काय फुका जन्मला १?।।१।।
पोट भरावे - सगळे म्हणती ।
ऐसी जरी सगळ्यांची गणती ।
तरि गेली संस्कृतिची नीति ।
सेवा - धर्मचि जाई लयाला ।
नाहितरि काय फुका जन्मला ।।२।।
जगणे -मरणे सगळे जाणे ।
याने संपत, साही गाणे !
पर-उपकाराविण का जीणे-
तुकड्यादास म्हणे सगळ्याला ?
नाहीतरि काय फुका जन्मला ? ।।३।।
सिरसदेवी, दि. १८-0९-१९६१