अवगुण कानि न घ्या गुरु माझे

(चाल- आया हँ दरबार तुम्हारे...)
अवगुण कानि नघ्या गुरुमाझे ।
पश्चातापे शरण मी आलो, पार करा मम जीवन ओझे ! ।।धृ0।।
बुद्धि-विकास न जोवरि होतो ।
तोवरि अज्ञानी जिव  राहतो ।।
म्हणुनिच घडते, पाप अगाधे ! ।। अवगुण0।।१।।
सत्‌-संगाविण ज्ञान कुणाला -
झाले, हे कळले न अम्हाला ? ?
कोण   तरिल   ऐशा   अंदाजे ? ।। अवगुण0।।२।।
ऐसे   झाले    आजवरी   हे !
कळले सगळे दु:ख उरी हे ।।
तुकड्या म्हणे, ऐका गुरुराजे ?।। अवगुण0।।३।।
                                        वरोरा, दि. 0२-११-१९६१