हात धरोनी न्या मज आता

(चाल: नाच-नाचुनी अति दमले मी...)
हात धरोनी न्या मज आता, अगम - निगम सुगमाला ।
गडे हो ! अगम - निगम सुगमाला ।।धृ0।।
डोळे असुनी दिसे न काही, समजु कसा मी त्याला ?
ऐकू ये पण ओळख नसता, लागु कसा नादाला ? ।।१।।
गुरुपद कमली नाद वाहतो, सोsहं ध्वनि उन्मनिला !
जिकडे तिकडे प्रकाश पसरे, प्रकाश्य हा कोणाला? ।।२।।
पाहतो कोण तो, कुणास पाहे, काय विषय बघण्याला ?
सत्‌-चित्‌-आमंदाच्या ऊर्मी, उठती का स्वरुपाला ? ।।३।।
म्हणुनिच म्हणतो धरा हात हा, अनुभव मज होण्याला 
तुकड्यादासा सद्गुरुचे बळ, पार करिल द्वैताला ? ।।४।।
                             -वरोरा प्रवास, दि. 0२-११-१९६१