कीर्तनाच्या रंगी हरी रंगला
(चाल: गाडीवाले ! गाडी धीरे हाक रे...
कीर्तनाच्या रंगी हरी रगला ।
भोळ्या भाविकासी छंद लागला ! ।।ध0।।
युक्तिवादी, बुध्दिवादी पाहती डोकावुनी ।
त्यांना वाटे वेड्यांचा बाजार जाहला झणी ।।
देहभान हे विसरुनी त्यांनी, स्वाभिमान सोडला ।।१।।
यमराजाच्या दरबारी जंव,स्वाभिमानी पोहोचती ।
अहंकार घेउनी शिरावरी, घट्ट उभे राहती ।।
केल्या दुष्कर्माच्या बदली, जाती भोगावया ।।२।।
नम्र सदा देवाच्या पायी, काम - क्रोध सोडुनी ।
तोचि आवडे प्रभुरायाला, नाचे हरी कीर्तनी ।।
सत्कर्माचे, सत्धर्माचे, त्यासी म्हणे आपुला ।।३।।
युक्ति-बुध्दी-भक्ति यांची सांगड जे घालती ।
वैराग्याच्या तपोबलाने प्रेमा संपादिती ।।
तुकड्यादास म्हणे कनका जणु सुगंध हा लागला ।।४।।
-दिल्ली, दि. 0७-0८-१९६0