गायका ! म्हण गाणे अपुले !
(चाल: मुकुंदा रुसु नको इतुका...)
गायका ! म्हण गाणे अपुले ! !
मोकळे शब्द उमटू दे खुले ।।धृ0।।
अर्थ अगोदर तुलाच कळू दे, मन तन्मय तेणे उसळू दे।
रंगुनि जाई स्वर-तालाने, डोलू दे जशी बहरली फुले ।।१।।
विसरुनि जाई देह-भावना, अन्य न येवो खुळ्या कल्पना ।
निश्चयि निर्भय शब्द प्रवाहे, निघू दे बीज उन्नत रुतले ।।२।।
एरव्हि गाणे म्हणा कशाला ? रडणे तरि जन न म्हणो बोला ।
तुकड्यादासा सद्गुरुचा वर, घेउनी कार्य करी उरले ! ।।३।।
-गुरुकुज आश्रम, दि. 0६-११-१९६१