तुजविण जिव ना कंठे
(चाल: धन मत जोडे-जोडे...)
तुजविण जिव ना कंठे । प्रभु ! दर्शन देशी कोठे ?।।धृ0।।
अपुल्या -अपुल्या घरट्यांमाजी,पक्षी किलबिल करिती हे ।
त्यांना दुसरे कोण शांतवी ? बघता येती काटे ।।१।।
बादल येई आच्छादित जव, नभमंडळ हेलावे हे ।
चातक-मन अति प्रसन्न होउनि, उडे बागडे थाटे ।।२।।
सती पती पाहताचि नयनी, तन्मय होण्या धावे हे ।
तुकड्यादास तुझ्या रुपि मिळण्या, क्षणहि युगासम वाटे ।।३।।
-नशिराबाद, दि. १३-१२-१९५३